अहेरी नगर पंचायतीत विविध कामांचा धडाका, कोट्यवधीचा निधी मंजूर

भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते भूमिपूजन

अहेरी : नगर पंचायतअंतर्गत येत असलेल्या विविध प्रभागांमध्ये विविध प्रकारच्या विकासात्मक कामांची सुरूवात करण्यात आली. माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

प्रभाग क्रमांक तीन मध्ये एक कोटींच्या निधीतून विकास कामे केली जाणार आहेत. या कामांसाठी नगरसेवक अमोल मुक्कावार यांनी मंत्री धर्मरावबाबा आत्राम आणि माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्याकडे निधीची मागणी केली होती. प्रभाग क्रमांक तीनचा चेहरामोहरा बदलविण्यासाठी मंत्री धर्मरावबाबा यांनी तब्बल एक कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या निधीतून सिमेंट रस्ते, नाली बांधकाम तसेच इतर विकास कामे केली जाणार आहेत.

भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन झाले. याप्रसंगी नगरसेवक अमोल मुक्कावार, प्रदीप सडमेक, मांतय्या आत्राम, बुधाजी सडमेक, अशोकराव अमनवार, शंकर कटलावार, सुधाकर आत्राम, लक्ष्मीताई येमुलवार, दिलीप सडमेक, दिलीप गणमुकुलवार, तसेच या प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रभाग १६ मध्ये सभामंडप, विहाराचे काम होणार

अहेरी नगर पंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक १६ मध्ये विविध विकास कामे होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले. या प्रभागमधील नागरिकांची बुद्ध विहार, सभा मंडप तसेच इतर विकास कामे करण्याची मागणी होती. त्या अनुषंगाने भाग्यश्री आत्राम यांनी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडे ही मागणी मांडत निधी खेचून आणला. नागरिकांची मागणी लक्षात घेता धर्मरावबाबा यांनी निधी उपलब्ध करून दिल्याने याठिकाणी विविध विकास कामे केली जाणार आहेत.

भूमिपूजनप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, नगरसेवक अमोल मुक्कावार, नारायण बोरकुटे, आनंदराव सुनतकर, अरुण रामटेके, मोहन कांबळे, राजेश्वर सुनतकर, अमोल रामटेके, राजू कोंडागुर्ले, विजय सुनतकर, राजेश रामटेके, रवींद्र बोरकुटे आदी उपस्थित होते.