माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते सभामंडपाचे भूमिपूजन

चिंचगुंडीवासियांची मागणी झाली पूर्ण

अहेरी : तालुक्यातील चिंचगुंडी येथे माजी जि.प. अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते सभामंडप बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.

या गावातील नागरिकांना गावातील विविध सभा आयोजित करताना झाडाखाली किंवा इतरत्र बसून सभा घ्याव्या लागत होत्या. गावात सभामंडप झाल्यास ही समस्या दूर होणार म्हणून गावकऱ्यांनी भाग्यश्री आत्राम यांच्याकडे मागणी केली होती. नागरिकांची अडचण लक्षात घेऊन त्यांनी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना सभामंडप बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली. आमदार निधीतून धर्मरावबाबा यांनी ७ लाख ३८ हजार रुपये मंजूर केले.

हा निधी प्राप्त होताच माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी चिंचगुंडी येथील सभामंडप बांधकामाचे भूमिपूजन करून या कामाला सुरूवात केली. आता त्या गावाकऱ्यांची अडचण दूर होणार असल्याने गावातील नागरिकांनी ताईंचे आभार मानले.

या भूमिपूजन कार्यक्रमाला सरपंच कमला बापू आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, नगरसेवक अमोल मुक्कावार, मखमुर शेख, रामू कस्तुरवार, बिच्चू मंचालावार, बापू गानालावार, शंकर बाकोलू, रामन्ना कस्तुरवार, तिरुपती पालेवार, राजू आत्राम, राजाराम कुमरे, राकेश गानालावार, विनोद देवरवार, गागुबाई कंपेलवार, हरीश येमुलवार आदी गावकरी उपस्थित होते.