आरमोरी : माजी आमदार कृष्णा गजबे यांनी आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा येथे भेट देऊन गावातील नागरिकांशी विविध विषयांवर संवाद साधला. यावेळी त्यांनी ग्रामस्थांच्या समस्या आणि अडीअडचणी जाणून घेतल्या.

या भेटीदरम्यान गजबे यांच्यासोबत अशोक दोनाडकर, व्यंकट चौधरी, शंकर नखाते, काशिनाथ दोनाडकर, केवळराम प्रधान, मोतीलाल लिंगायत, मोरेश्वर मेश्राम, कैलास दोनाडकर, संतोष प्रधान, हिवराज बुल्ले यांच्यासह मोठ्या संख्येने गावातील नागरिक उपस्थित होते. यावेळी गजबे यांनी उपस्थित नागरिकांशी गावाच्या विकासासंबंधी, तसेच इतर महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा केली.