गडचिरोली : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालय अहेरी यांच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024-25 करिता अहेरी उपविभागात धान खरेदी केंद्रांवर सुरु असलेल्या खरेदी प्रक्रियेची मुदत 31 मे 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

सिरोंचा तालुक्यातील सिरोंचा, आसरअल्ली, अमरादी, अंकिसा, वडधम, जाफ्राबाद, बामणी, पेंटिपाका आणि विठ्ठलरावपेठा या नऊ खरेदी केंद्रांवर ही सुविधा उपलब्ध राहणार आहे. संबंधित ठिकाणी टिडीसी गोदाम, एपीएमसी गोदाम, महात्मा गांधी गोदाम, ग्रामपंचायत गोदाम, वनविभागाचे गोदाम, कृषी गोदाम आणि शासकीय आश्रमशाळेतील गोदामांमध्ये धान खरेदी सुरू आहे.
शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करूनच धान विक्रीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे. नोंदणीसाठी ई-पिक पत्रक (सातबारा, नमुना 8 अ), आधारकार्ड, बँक पासबुक, ई-केवायसी तसेच संमतीपत्र आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी या सर्व कागदपत्रांसह वेळेत नोंदणी करून शासनाच्या आधारभूत दराने खरेदी योजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आदिवासी विकास महामंडळ, अहेरीचे उपप्रादेशिक व्यवस्थापक बी.एस. बरकमकर यांनी केले आहे.

































