अहेरी : तालुक्यातील नागेपल्ली येथील सिनबिना जेमनिक लाकडा हे कॅन्सरने ग्रस्त आहेत. पण घरची परिस्थिती अत्यंत गरीबीची असल्याने त्यांना उपचार घेण्यासाठी आर्थिक अडचण होत होती. सिनबिना लाकडा यांच्या प्रकृतीची माहिती नागेपल्ली येथील आविसं व अजयभाऊ मित्र परिवाराच्या कार्यकर्त्यांकडून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांना मिळाली. माहिती होताच सदर कॅन्सरग्रस्त महिलेच्या उपचारासाठी कंकडालवार यांनी अहेरी येथील जनसंपर्क कार्यालयात आर्थिक मदत दिली.
यावेळी नागेपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच लक्ष्मण कोडापे, माजी जि.प.सदस्य अजय नैताम, अहेरीचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, किशोर दुर्गे, मरपल्लीचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम, विनोद रामटेके, रवी भोयर, नरेश गर्गम, राकेश सडमेक, प्रकाश दुर्गे, लक्ष्मण आत्राम, प्रमोद गोडसेलवार यांच्यासह आविसं व अजयभाऊ मित्र परिवाराचे कार्यकर्ते उपस्थित होते.