गडचिरोली : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची गडचिरोली जिल्ह्यातील अनेक कामे नेहमीच वादग्रस्त राहिली आहेत. अगदी शहरातून जाणाऱ्या मार्गावरची कामेही अर्धवट आणि दर्जाहीन झालेली असताना त्याकडे दुर्लक्ष केले जाते. पण आता तर या विभागाने कहरच केला. राष्ट्रपतींच्या दौऱ्यानिमित्त बनविण्यात आलेला इंदिरा गांधी चौक ते खरपुंडी नाक्यापर्यंतचा डांबरी रस्ता चक्क १५ दिवसात उखडून त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले. त्यामुळे खरंच हे काम राष्ट्रीय महामार्गाच्या दर्जाचे होते का, असा प्रश्न निर्माण होत आहे.
राष्ट्रीय महामार्गावरच्या डांबरीकरणाला अवघ्या १५ दिवसात पडले खड्डे
लाखोंच्या उधळपट्टीतून साध्य काय केले?