गडचिरोली : माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांनी शुक्रवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन रुग्णसेवेची प्रत्यक्ष पाहणी केली. रुग्णांच्या सेवेत कोणतीही तडजोड न करता दर्जेदार सेवा द्या, अशी सूचना त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांसह इतर अधिकाऱ्यांना दिली.
आकस्मिक कक्षात भरती असलेल्या जनार्धन साखरे यांच्या पत्नीवरील उपचारांबाबतच्या चौकशीच्या निमित्ताने डॅा.नेते यांनी रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णालयातील विविध विभागांना भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. रुग्णसेवेत कोणतीही अडचण, दुर्लक्ष किंवा गैरसोय होत असेल तर माझ्याशी संपर्क करा, असेही त्यांनी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना सांगितले.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.माधुरी किलनाके, उपशल्यचिकित्सक डॉ.सतीशकुमार सोळंके यांच्यासह इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांशी डॅा.नेते यांनी चर्चा केली.
या भेटीदरम्यान किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.भारत खटी, ज्येष्ठ नेते जनार्धन साखरे, तसेच रुग्णालयातील अधिकारी-कर्मचारी व स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.