अहेरी : वाढत्या प्रदुषणात मोकळा श्वास घेण्यासोबत सकाळ, संध्याकाळ नागरिकांना फेरफटका मारण्याची सोय अहेरीत करण्यात आली आहे. नागरी दलितेत्तर वस्ती सुधार योजना (पुनर्विनियोजन) सन २०२०-२१ अंतर्गत ७५ लाख ९ हजार ७३४ रुपयांच्या निधीतून प्रभाग क्रमांक १ जवळील खमनचेरू मार्गावरच्या मोकळ्या जागेत सौंदर्यीकरण करण्यात आले. सुंदर आणि आकर्षक सजावटीसोबत या ठिकाणी अहेरीकरांना आता मोकळा श्वास घेता येणार आहे. त्याचे लोकार्पण ना.धर्मरावबाबा यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प. अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम, माजी पं.स. सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम, नगराध्यक्ष रोजा करपेत, उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन, बांधकाम सभापती नौरास शेख, पाणीपुरवठा सभापती लक्ष्मी मद्दीवार, महिला व बालकल्याण सभापती मीना ओंडरे, कंत्राटदार अरुण मुक्कावार, मुख्याधिकारी एन.सी. दाते, नगरसेवक अमोल मुक्कावार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, प्रशांत आईचवार, श्रीकांत मद्दीवार, शंकर कटलावार, राहुल दुर्गे, अफसर खान, ताजू कुळमेथे, इमाम शेख, राजू आत्राम, तिरुपती पाले, सुमित मुडावार आदी उपस्थित होते.
विशेष म्हणजे सध्या सर्वत्र प्रदूषण वाढल्याने घरातून बाहेर पडणे कठीण झाले आहे. अहेरीलगत कुठेही पार्क नसल्याने नगर पंचायतीने पुढाकार घेऊन या ठिकाणी ओपनस्पेस सौंदर्यीकरण करण्याचे ठरविले होते. त्यामुळे लहान मुलांना, महिलांना तसेच वयोवृद्धांना याठिकाणी वेळ घालवता येणार आहे.