डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवनात आज जनसंवाद कार्यक्रम

संबंधित तक्रारींचे करणार निराकरण

गडचिरोली : महाराष्ट्र शासनाच्या सात कलमी कार्यक्रमाअंतर्गत सहायक आयुक्त, समाजकल्याण गडचिरोली (डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन) यांच्या कार्यालयात 29 एप्रिल रोजी दुपारी 3 ते 4 वाजेदम्यान जिल्हास्तरीय जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचा उद्देश सामाजिक न्याय विभागाशी संबंधित नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करणे हा आहे. ज्या नागरिकांना समाजकल्याण विभागाशी संबंधित काही समस्या, अडचणी किंवा तक्रारी आहेत, त्यांनी कार्यक्रमादरम्यान दिलेल्या लिंकद्वारे (https://meet.google.com/xoh-ixfd-eqh) आॅनलाईन सहभागी होऊन आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन सहायक आयुक्त सचिन मडावी यांनी केले आहे.

यावेळी प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर त्वरीत कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.