शिक्षक दिनावर बहिष्कार, आश्रमशाळा शिक्षकांचे काळ्या फिती लावून काम

मागणीकडे वेधले शासनाचे लक्ष

गडचिरोली : आदिवासी विकास विभागातील राज्यभरातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी 5 सप्टेंबरच्या शिक्षक दिनावर बहिष्कार टाकत काळ्या फिती लावून काम केले. शाळेची वेळ पूर्वीप्रमाणे 11 ते 5 करण्याच्या मागणीसाठी लक्ष वेधन्यासाठी हे बहिष्कार आंदोलन करण्यात आले. याता आश्रमशाळा कर्मचाऱ्यांकडून जिल्ह्यात 100 टक्के प्रतिसाद मिळाला.

सध्या आश्रमशाळेची वेळ सकाळी 5.45 ते सायंकाळी 4 अशी असल्याने विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ती अत्यंत अडचणीची व गैरसोयीची होत आहे. त्यामुळे ही वेळ पूर्वीप्रमाणे 11 ते 5 अशी करण्यात यावी यासाठी सीटू संघटनेच्या वतीने शासन व प्रशासनास निवेदने देण्यात आली. पण त्याची दखल घेण्यात आली नाही. राज्यात शासकीय 596 तर अनुदानित 556 अशा एकूण 1152 आश्रमशाळा आहेत.