देसाईगंज : आमदारांच्या स्थानिक विकास निधीअंतर्गत वैशिष्ट्यपुर्ण निधीच्या माध्यमातून येथील विपश्यना केन्द्राकडे जाणाऱ्या पांदण रस्त्याच्या खडीकरण बांधकामाचे भूमिपूजन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते पार पडले.
देसाईगंज येथे विपश्यना केन्द्रात नियमित ध्यानसाधना शिबिरे सुरु असतात. या केन्द्राकडे जाणारा पांदण रस्ता हा शेतकऱ्यांच्या आवागमनाचा रस्ता असल्याने शेतीच्या हंगामात या रस्त्याची अतिशय दुरवस्था होते. त्यामुळे शेतकऱ्यांसोबत विपश्यना ध्यानसाधनेला जाणाऱ्या साधकांनाही त्रास सहन करावा लागत होता.
या संदर्भात काही साधकांनी व शेतकऱ्यांनी मा.आ.कृष्णा गजबे यांच्याकडे पांदन रस्त्याचे खडीकरण करुन देण्याची मागणी केली होती. त्यानुसार गजबे यांनी न.प.चे मुख्याधिकारी डॉ.कुलभूषन रामटेके यांच्याशी चर्चा करून आपल्या स्थानिक विकास निधीतून 20 लक्ष रुपये निधीची तरतुद करुन दिली होती. सदर रस्त्याचे खडीकरण देसाईगंज नगर परिषदेच्या यंत्रणेमार्फत करण्यात येत आहे.
भूमिपूजनप्रसंगी राजरतन मेश्राम, डॉ वंदना धोंगडे, रुपेश सुखदेवे, पृथव रामटेके, विजय हेडाऊ, अनुताई कुऱ्हा, विजया मोटघरे, प्रतिभा रहाटे, राहुल बोरकर, न.प. इंजिनियर सौरभ नंदनवार, अमोल पत्रे, प्रकाश राहाटे, मुश्श्यु पटेल, मोहसिन सय्यद, नसिम पठान, राशिद शेख, सुनील दोनाडकर, हेमंत गझघाटे यांच्यासह साधक व शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते.