गडचिरोली : येथील आरमोरी रोडवरील लक्ष्मीनगरात सतीश मुनगंटीवार यांच्या घराच्या बाजूच्या नालीजवळ संध्याकाळी आढळलेल्या अत्यंत विषारी समजल्या जाणाऱ्या घोणस सापाला सर्पमित्राने पकडून जीवदान दिले. साप निघाल्याची माहिती भ्रमणध्वनीवरून कळविल्यानंतर सर्पमित्र योगेश हजारे यांनी लागलीच तिथे पोहोचून सापाला शिताफीने पकडले आणि सुरक्षितपणे जंगलात सोडले. त्यामुळे वॅार्डातील सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

घोणस हा अत्यंत विषारी साप असल्याचे कळल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बाजूलाच होळीची तयारी सुरू होती. त्यामुळे सापाला पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमली. सर्पमित्र योगेश हजारे यांनी सापाला मोठ्या शिताफीने पकडून बरणीमध्ये बंद केले व चांदाळा मार्गावरील जंगलात सोडले.
सापाला पकडण्यासाठी सतीश मुनगंटीवार, सुधीर शेंडे, सुरेश वरगंटीवार, अनिल प्यारमवार, दिवाकर कांबळे, प्रमोद चिलवरवार, समीर सुरमवार, कालिदास गेडाम, अनुराग मुनगंटीवार, अस्मित बिसेन, मोंटू बिसेन, चंदू कोवे आदींसह लक्ष्मीनगरातील नागरिकांनी मदत केली.