रस्ता होत नसेल तर सिरोंचा मार्गावर विमानसेवा सुरू करा

शिवसेनेचे जंबेवार यांची मागणी

गडचिरोली : गेल्या सहा वर्षांपासून सिरोंचा ते आलापल्ली, आलापल्ली ते आष्टी मार्गाची दुर्दशा झाली आहे. या मुद्द्यावर शिवसेनेच्या (शिंदे गट) वतीने मुख्यमंत्र्‍यांच्या नावे निवेदन देऊन हा रस्ता चांगला करणे शक्य नसेल तर सिरोंचा ते गडचिरोली विमानसेवा सुरू करा, अशी मागणी जिल्हा सहसंपर्क प्रमुख हेमंत जंबेवार यांनी केली आहे. (सविस्तर बातमी खाली वाचा)

त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, वनकायद्याच्या नावाने अनेक वर्षांपासून बनवाबनवी सुरू आहे. राष्ट्रीय महामार्ग नव्हता तेव्हापासून हा रस्ता आहे. मग तेवढाच रस्ता चांगल्या अवस्थेत ठेवायला पाहिजे होता. पण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अभियंत्यांनी मागचा-पुढचा विचार न करता रस्ता फोडून टाकला. त्यामुळे आता लोकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सिरोंचातील लोक महाराष्ट्राचे रहिवासी नाहीत का? त्यांना जिल्हा मुख्यालयी यायचे असेल तर 50 ते 60 किलोमीचे जास्त अंतर कापून तेलंगणातून यावे लागते. सरकार म्हणून तुम्ही काय उपायोजना केली? सरकार म्हणून एकदा सर्व विभाग प्रमुखांचे दौरे करून लोकसंवाद साधला का? सरकारने लवकरात लवकर हा रस्ता तयार कसा करायचा हे बघावे, नाहीतर सिरोंचा ते गडचिरोली विमानसेवा सुरू करावी, अशी विनंतीवजा सूचना जंबेवार यांनी केली आहे.