गडचिरोली : आपल्या एका शिवसैनिकाचे हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन झाल्याने पोरक्या झालेल्या त्यांच्या दोन्ही मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी शिवसेना नेते अरविंद कात्रटवार यांनी घेतली. एवढेच नाही तर त्यांच्या यावर्षीच्या शेतीच्या मशागतीचा खर्चही उचलला. शिवसेनेचा (उबाठा) वर्धापन दिन साजरा करताना तो सेवाभाव दिन म्हणून पाळत कात्रटवार यांनी आपल्यातील खरा शिवसैनिक जागरूक असल्याचे दाखवून दिले.
गडचिरोली तालुक्यातील चांभार्डा येथील शिवसैनिक रामदास ठाकरे यांच्या कुटुंबाला दिलेल्या या आधाराचे संपूर्ण गावकरी साक्षीदार होते. मृत ठाकरे यांना पत्नी वनिता आणि दोन मुली आहेत. मोठी मुलगी तारकेश्वरी दहावीत, तर लहान मुलगी जान्हवी आठव्या वर्गात शिक्षण घेत आहे. पतीच्या आकस्मिक निधनामुळे अल्पभूधारक कुटुंबातील वनिता व त्यांच्या दोन मुलींवर मोठा आघात झाला. पक्षाच्या विविध जनआंदोलनात सहभागी होऊन जनतेच्या हक्कासाठी लढणाऱ्या शिवसैनिकाच्या निधनामुळे संवेदनशिल नेते अरविंद कात्रटवार हेलावले. त्यांनी आपल्या शिवसैनिकांसह चांभार्डा गावात जाऊन रामदास ठाकरे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यांचे सांत्वन करत खचून जाऊ नका, मी तुमच्या पाठीशी आहे, असे सांगून धीर दिला. (अधिक बातमी खाली वाचा)

कात्रटवार यांनी कुटुंबाला आधार देत जीवनावश्यक साहित्य, पिकांच्या लागवडीपासून ते पिक निघेपर्यंत शेतीच्या संपुर्ण मशागतीचा खर्च आणि शिक्षण घेत असलेल्या दोन्ही मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी स्विकारून त्यांच्यामध्ये नवचैतन्य निर्माण करून जगण्याचे बळ दिले.
याप्रसंगी यादव लोहंबरे, गोपाल मोगरकर, प्रशांत ठाकुर, दिलीप वलादे, स्वप्नील जुमनाके, विनोद चापले, अतुल जुमनाके, राजेंद्र खेडेकार, जयदेव मेश्राम, दिलीप आवारी, गुलाब शेरकी, गुरूदास कोडाप, महेश खेडकार, प्रफुल मेश्राम, साहिल कोसमशीले, दीपक कोसमशिले, भूषण शेरकी, हरिदास रामटेके, सुनील कोसमशीले, मनोहर कोसमशीले, पुरुषोत्तम आवारी, राजेंद्र मेश्राम, पुरुषोत्तम कुमरे, नवनाथ नरुले, मयूर मेश्राम, आशिष निकुरे, जीवन उसेंडी, रामू सलामे, अमित आवारी, यादव चौधरी, मुखरू मलोडे, जीवन कुरुडकर, देवेंद्र वलादे, अमित हुलके, अजय सेलोटे, आशिष शेडमाके, गिरीष टेकाम, सचिन मडावी, मधुकर बावणे, सूरज वलादे, गंधर्व वलादे, वामन नैताम, दीपक लाडे यांच्यासह इतर अनेक शिवसैनिक आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.