सुरगावच्या शेतकऱ्यांना छत्र्यांचे वाटप, मानवाधिकार संघटनेचा पुढाकार

गोरगरीब रुग्णांना केली आर्थिक मदत

गडचिरोली : नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल अशा वेंगनूर येथील उपकेंद्राला राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष प्रणय खुणे यांच्यासह राष्ट्रीय प्रवक्ता ज्ञानेद्र बिस्वास, डॅा.भारत खटी, सरपंच भास्कर बुरे, गुड्डू खुणे आदींनी भेट दिली. तसेच गावातील नागरिकांना छत्र्‍या आणि टॅार्चचे वाटप केले. यावेळी उपकेंद्राचे डॅाक्टर उपस्थित होते. पण या उपकेंद्राला रुग्णवाहिका, आरो वॉटर मशीन, संरक्षक भिंत, शासनाने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली.

गडचिरोली जिल्हा सर्वात श्रीमंत जिल्हा असूनही अतिशय गरीब आहे. सुरजागड येथील कोट्यवधी रुपयांच्या करातून संपूर्ण जिल्हा सुजलाम सुफलाम होऊ शकतो. सुरजागड येथे आपणसुद्धा नोकरी करू शकतो, पण आपल्याला शिक्षण घेणे महत्वाचे असल्याची भावना प्रदेश अध्यक्ष प्रणय खुणे यांनी छत्री वाटत कार्यक्रमाप्रसंगी बोलताना व्यक्त केली.

मानवाधिकार संघटना नेहमी जनतेच्या हिताचे कार्य करीत असते. मागील अनेक वर्षांपासून विविध सामाजिक संघटना, राजकीय संघटना, उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार, गोरगरीब जनतेला टॉर्च, छत्र्यांचे वाटप, रुग्णालयात गरीब रुग्णांना औषध व आर्थिक मदत करत असते, असे यावेळी सांगण्यात आले.