देसाईगंजच्या कन्नमवार वॅार्डात केला जातो एक दिवसाआड टँकरने पाणीपुरवठा

महिलांचा नगर प्रशासनाला अल्टिमेटम

देसाईगंज : शहरातील कन्नमवार वॅार्डात सिमेंट काँक्रिट रस्ता तयार करताना केलेल्या खोदकामात नळ योजनेची पाईपलाईन फुटली. त्यामुळे नळाद्वारे पाणीपुरवठा बंद करून टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. त्यातही एक दिवसाआड टँकर येत असल्याने भर उन्हाळ्यात नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या स्थितीविरोधात वॅार्डातील महिलांनी एकत्र येऊन ही समस्या तत्काळ न सोडविल्यास आंदोलन करण्याचा इशारा नगर प्रशासनाला दिला आहे.

कन्नमवार वॅार्डात नगर परिषदेच्या नळ योजनेची पाईपलाईन फुटल्याने पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. यामुळे वॅार्डातील नागरीकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान शनिवारी महिलांनी याविरोधात आवाज उठवत काँग्रेस कार्यकर्ते पिंकू बावणे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्याचा अल्टिमेटम नगर प्रशासनाला दिला आहे. यावेळी लिलाधर भर्रे, मोहित अत्रे, तसेच वार्डातील शकील उईके, गिता शर्मा, नलिना तेलतुंबडे, भीमाबाई सहारे, इंदू सहारे, इंदिरा कुंभरे, रोशनी बुराडे, जोत्सना उईके, अल्का पेंदाम, रिना उईके, दीपाली भानारकर, अनिता गोरडवार, सुनिता नागापुरे, मंगला कामतवार, गयाबाई बावणे, संतोषी सयाम, अनिता नागलवाडे, प्रिती बनकर, मंदा कामटे, अल्का ठवकर, मिनाक्षी सोनेकर, विणा ढोक, रोशनी बुराडे, नेहा उके आदी महिला उपस्थित होत्या.

कन्नमवार वॅार्डात मागील तीन महिन्यांपूर्वी सिमेंट काँक्रिट रोड तयार करण्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे. दरम्यान नळ योजनेची पाईपलाईन फुटल्याने पाणीपुरवठा बंद करून टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. दररोज पाणी पुरवठा केला जात नाही. याबाबत नागरीकांनी नगर प्रशासनाला वारंवार विनंती करून नळ योजना पूर्ववत करण्याची मागणी केली. मात्र त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्या जात असल्याचा आरोप केल्या जात आहे.

सांडपाणी वाहते रस्त्यावरून

विशेष म्हणजे रस्त्यासाठी खोदकाम करताना रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या नाल्यांची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे सांडपाणी चक्क रस्त्यावरुन वाहात आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कंत्राटदाराने केलेल्या प्रतापाचा फटका नागरिकांना विनाकारण सहन करावा लागत आ