राजारामच्या जि.प.शाळेला पहिल्याच दिवशी मिळाली नवीन वर्गखोली

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते उद्घाटन

अहेरी : पंचायत समितीअंतर्गत येत असलेल्या राजाराम ग्राम पंचायतच्या हद्दीत जिल्हा परिषद केंद्र शाळा असून इयत्ता १ ते ७ वी पर्यंतचे वर्ग तिथे भरतात. या शाळेत २०० च्या जवळपास विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र गेल्या अनेक वर्षापासून वर्गखोल्यांची कमतरता भासत असतानाही त्याकडे दुर्लक्ष सुरू होते. माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी त्यात लक्ष घालून वर्गखोल्यांचे बांधकाम करण्याचा शब्द दिला होता. तो पूर्ण होताच त्यांच्याच हस्ते नवीन बांधकामाचे उद्घाटनही करण्यात आले.

राजाराम येथे केन्द्रस्तरीय बाल क्रीडा संमेलन आयोजीत करण्यात आले होते. त्याअनुषंगाने माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडलवार आले होते. त्यावेळी माजी सभापती भास्कर तलांडे यांनी नवीन वर्गखोलीची मागणी केली. कंकडालवार यांनी त्याचक्षणी शब्द देत जिल्हा परिषदेच्या कोणत्याही निधीतून शाळेच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करू देणार असे सांगितले. त्यानुसार जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यात आला होता, मात्र स्थानिक राजकारणामुळे सदर वर्गखोली झाली नव्हती व निधी परत करण्यात आला.

दरम्यान पुन्हा सदर नवीन वर्गखोलीचे बांधकाम आवश्यक असल्याचा विषय माजी सभापतींनी रेटून धरला. त्यामुळे कंकडालवार यांनी एका नवीन वर्ग खोलीसाठी निधी देवून मंजूर केला होता. सदर वर्गखोलीचे बांधकाम पूर्ण झाले. शालेय सत्राच्या पहिल्याच दिवशी ती खोली विद्यार्थ्यांना बसण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली. आविसं व अजयभाऊ मित्र परिवाराचे नेते, कृ.उ.बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.