अहेरी : अहेरी वनपरिक्षेत्रातील लगाम उपक्षेत्रात एका निलगायीची शिकार झाल्याचा प्रकार समोर आला. शिकार केल्यानंतर शरीराचे अवयव पोत्यात भरून दुचाकीवरून घेऊन जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी त्यांना हेरले. पण पोलीस आपला पाठलाग करत असल्याचे लक्षात येताच त्यांनी पोते रस्त्यात टाकून पळ काढला.

एका पोत्यात निलगायीचे शिंग, तर दुसऱ्या पोत्यात दोन पाय आढळले. पोलीस उपनिरीक्षक चैतन्य घावटे यांनी वनअधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी पंचनामा केला. अवयवांची तपासणी केल्यानंतर पशुधन अधिकारी डॅा.चेतन अलोने यांनी ते अवयव प्रादेशिक न्याय वैद्यक विज्ञान प्रयोगशाळा, नागपूर येथे फॅारेन्सिक रिपोर्टसाठी पाठविले.
लगान आणि अहेरी उपक्षेत्रात वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या लागोपाठ दोन घटना उघडकीस आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.