भाजप कार्यकर्त्यांच्या सतर्कतेने मिळाले 70 गोवंशांना जीवदान

सिनेस्टाईल पकडला ट्रक

धानोरा : येथून चातगावच्या दिशेने 70 गोवंशांना घेऊन जात असलेल्या एका मोठ्या ट्रकला सिनेस्टाईल पकडण्यात आले. भाजप कार्यकर्त्यांनी यासंदर्भातील माहिती दिल्यानंतर त्या ट्रकला पोलिसांच्या मदतीने पकडण्यात आले. यामुळे 70 गोवंशीय जनावरांना जीवनदान मिळाले.

झाले असे की, धानोरा येथील भाजप कार्यकर्त्यांना पेंढरीकडून येत असलेल्या एका मोठ्या ट्रकमध्ये जनावरे असल्याचा संशय आला. त्यामुळे सारंग साळवे यांच्यासह काही भाजप कार्यकर्त्यांनी त्या ट्रकचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. पण धानोरातील बाजार चौकातूनही या तो ट्रक वेगाने पुढे निघाला. ट्रकला पकडण्यात अपयश आल्याने. साळवे यांनी आमदार डॅा.मिलिंद नरोटे यांना यासंदर्भातील माहिती देऊन पोलिसांना सूचना करण्याची विनंती केली. डॅा.नरोटे यांनी पोलिसांना कळवताच धानोराच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी चातगाव येथे नाकाबंदी करण्यास सांगितले.

चातगाव येथे पोलिसांना पाहून ट्रक चालक व त्याचा एक सहकारी ट्रक थांबवून पळून गेले. परंतु त्यांचा एक सहकारी पोलिसांच्या हाती लागला. पुढील चौकशी चातगाव पोलीस करत आहेत.