आलापल्ली : ज्यांच्यावर वन आणि वन्यजीवांच्या संरक्षणाची जबाबदारी आहे त्यांनीच वन्यप्राण्याची शिकार करून मांस शिजवल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी उपवनसंरक्षक दीपाली तलमले यांच्या निर्देशानुसार दोन वन कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, वनविकास महामंडळाच्या नागेपल्ली येथील कॅालनीतील दोन कर्मचाऱ्यांच्या घरात हरीणाचे मांस शिजत असल्याची माहिती नव्याने रुजू झालेल्या उपवनसंरक्षक दीपाली तलमले यांना मिळाली होती. त्यानुसार अहेरी वनपरिक्षेत्रातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन वनविकास महामंडळाच्या कॅालनीत रात्री धाड टाकली. शिजत असलेले मांस जप्त करून संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
दरम्यान अधिक चौकशीत या शिकारीत सहभाग असलेल्या आणि दोन कर्मचाऱ्यांवरही कारवाई सुरू असल्याचे समजते.