Home क्राईम धानोरा तालुक्यात आठ ठिकाणी दारू विक्रेत्यांविरूद्ध कारवाई

धानोरा तालुक्यात आठ ठिकाणी दारू विक्रेत्यांविरूद्ध कारवाई

गडचिरोली पोलिसांची मोहीम

गडचिरोली : गडचिरोली आणि कारवाफा पोलीस मदत केंद्राच्या पथकांनी संयुक्तपणे राबविलेल्या विशेष मोहिमेत धानोरा तालुक्यातील नवेगावच्या आठ दारु विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. यात एकूण 1,84,400 रुपयांचा मुद्येमाल हस्तगत करण्यात आला.

नवेगाव येथे अवैध दारुविक्री होत असल्याबाबतची माहिती कारवाफा पोलीस मदत केंद्राला मिळाली होती. त्यावरून पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पो.स्टे. आणि पोमकें कारवाफा येथील पथकांनी संयुक्तपणे अवैध दारु विक्रेत्यांविरुध्द मोहिम राबविली. यादरम्यान पोमकें कारवाफा येथील पथकाने पायी अभियान राबवित मौजा नवेगाव येथे पोहोचून सदर मोहिम राबविली. या मोहिमेदरम्यान घेतलेल्या झडतीदरम्यान एकूण 99,400 रुपयांचा देशी-विदेशी दारुचा मुद्येमाल जप्त करण्यात आला. तसेच एकूण 85,000 रुपये किमतीची गावठी दारु आणि गावठी दारु निर्मितीच्या हातभट्टी साहित्याचा नाश करण्यात आला.

या कारवाईत प्रभुदास शिशु गावडे (40 वर्षे), पंचफुला सुरेश नरोटे, (42 वर्षे), मनिषा केशव तुमरेटी (50 वर्षे), निलिमा वसंत तुमरेटी (35 वर्षे), दिलीप शिशु गावडे (32 वर्षे), अशोक तुळशिराम पदा (47 वर्षे), जैराम बुधाजी गावडे (58 वर्षे), आणि परसुराम पांडुरंग तुमरेटी (44 वर्षे) सर्व रा.नवेगाव, ता.धानोरा यांच्याविरूद्ध वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम.रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, कारवाफा जगदिश पांडे व उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली ठाण्याचे पोनि.विनोद चव्हाण, पोउपनि.मारबोनवार, पोहवा संजय पोल्लेलवार, पोहवा प्रेमकुमार भगत, पोहवा गुलाब कामतकर, पोमकें कारवाफाचे पोउपनि.संतोष कदम, पोउपनि.सुनिता शिंदे व अंमलदारांनी राबविली.