एटापल्ली : कसनसूर उपपोलिस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या हालेवारा पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील एका गावात एका युवकाने लग्नाचे आमिष दाखवत एका 16 वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण केले. यातून ती गर्भवती झाली. पीडित मुलगी पाच महिन्यांची गर्भवती झाल्यानंतर या प्रकरणाचे बिंग फुटले. याप्रकरणी पोलिसांनी विकेश सोमजी किरंगा (24 वर्षे) या युवकाविरूद्ध गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी पीडित मुलीचा जवाब घेतला. त्यावरून आरोपीला तिच्या वयाची पूर्ण जाणीव असतानाही त्याने तिच्याशी जवळीक साधली आणि आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले, असे स्पष्ट झाले. यामुळे संबंधित युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सद्यस्थितीत आरोपी युवक फरार असून त्याचा शोध सुरू आहे.