गडचिरोली : बहुप्रतीक्षित जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका यावर्षी होणार आहेत. त्यासाठी प्रभाग रचनेवर आलेले आक्षेप निकाली काढत अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने गडचिरोली जिल्ह्यातील 51 जिल्हा परिषद निवडणूक विभाग आणि 102 पंचायत समिती निर्वाचक गणांची अंतिम प्रभाग रचना 22 ऑगस्ट 2025 पर्यंत प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ही अंतिम प्रभाग रचना तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयातील सूचना फलकावर आणि जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर, तसेच जिल्हा परिषद कार्यालयातील सूचना फलकावर आणि सर्व तहसीलदारांच्या कार्यालयांतील सूचना फलकांवर, तसेच सर्व पंचायत समित्यांच्या कार्यालयांतील सूचना फलकांवर प्रसिद्ध करण्यात आली असल्याचे उपजिल्हाधिकारी (सामान्य) प्रसेनजीत प्रधान यांनी कळविले आहे.
येत्या चार महिन्याच्या आत या निवडणुका होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाच्या वतीने तयारी केली जात आहे.