‘नाम’ फाउंडेशनच्या वतीने पुण्यात प्रणय खुणे यांचा सत्कार

पाटेकरांना गडचिरोलीचे निमंत्रण

गडचिरोली : राज्यात सामाजिक कार्यात मोठे योगदान देणार्‍या नाम फाऊंडेशनचा दशकपूर्ती सोहळा पुण्यात उत्साहात झाला. यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील योगदानासाठी मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॅा.प्रणय खुणे यांचा ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अभिनेते तथा नामचे पदाधिकारी नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांना गडचिरोलीला येण्याचे निमंत्रण खुणे यांनी दिले.

“जे जे जगी जगते तया माझे म्हणा, करुणा करा” या भावनेशी प्रामाणिक राहून सप्टेंबर 2015 साली नाम फाउंडेशनची स्थापना झाली होती. या फाऊंडेशनच्या दशकपूर्ती वाटचालीत अनेकांनी सढळ हाताने माणुसकीच्या या यज्ञात मोठे योगदान दिले. हा मानवतेचा यज्ञ असाच अखंडपणे चालत राहील यासाठी 15 सप्टेंबर 2025 रोजी दशकपूर्तीनिमित्त आयोजित केलेल्या या स्नेहमेळाव्यात गडचिरोलीतून डॉ.प्रणय खुणे यांच्यासह 50 पदाधिकारी व कार्यकर्ते, शेतकरी सहभागी झाले होते. राज्याच्या विविध भागात प्रमुख सामाजिक उपक्रम राबविणारे, प्रामुख्याने नाम फाउंडेशनला मदत करणारे विविध कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला प्रामुख्याने केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमात नामचे संस्थापक अध्यक्ष नाना पाटेकर, सचिव मकरंद अनासपुरे प्रामुख्याने उपस्थित होते.

या कार्यक्रमाला गडचिरोली जिल्ह्यातून मानवाधिकार संघटनेच्या महिला आघाडी अध्यक्ष पौर्णिमा विश्वास, संघटनेचे जिल्हा मार्गदर्शक देवानंद पाटील खुणे, सरपंच गोपाल उईके, मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषा मडावी, राकेश खुणे, पुरुषोत्तम गोबाडे, नितेश खुणे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रशांत शहा, जिल्हा उपाध्यक्ष नानू उपाध्ये, किशोर कुंडू, जिल्हा सचिव प्रकाश थुल, तसेच मोरेश्वर भांडेकर, किशोर देवतळे, संतोष बुरांडे, दिनेश मुजुमदार, विलास वडेट्टीवार, रुपाली कावळे, पुष्पा करकाडे, पूनम हेमके, असे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.