भामरागड तालुक्यात सेवा पंधरवड्यानिमित्त विविध उपक्रम

शासकीय योजनांचा देणार लाभ

भामरागड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस (17 सप्टेंबर) ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती (2 आॅक्टोबर) यादरम्यान सेवा पंधरवडा साजरा केला जाणार आहे. यादरम्यान भामरागड तालुक्यात विविध उपक्रम राबविले जाणार असून शासकीय योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ देण्यासाठी प्रशासनाने तयारी केली असल्याची माहिती तहसीलदार किशोर बागडे यांनी दिली.

पांदन रस्ते शोधून त्यांना क्रमांक देणे- सर्व ग्राम महसूल अधिकारी, मंडक अधिकारी आणि महसूल सेवकांनी प्रत्येक गावात स्थानिक गावकऱ्यांसोबत शिवार फेरी करून सर्व पांदन रस्त्यांची माहिती प्रा्त केली आहे. शिवारफेरीनंतर नकाशावर असलेले पांदन रस्ते 34 आणि नकाशावर नसलेले पांदन रस्ते 124 आढळून आले आहेत. या सर्व पांदन रस्त्यांना भूभिअभिलेख विभागामा्र्फत मोजणी करून तहसिलदारांमार्फत विशिष्ट क्रमांक देण्याची कार्यवाही सुरू आहे.

दिनांक 1 जानेवारी 2011 पूर्वी शासकीय अतिक्रमण केलेल्या कुटुंबांना सदर शासीय जमिनीवर अतिक्रमण नियमानुकूल करून शासकीय पट्ट्यांचे वाटप केले जाणार आहे.
प्रत्यक्ष अतिक्रमण केलेल्या जागेवरील संबंधितांना ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी आणि महसूल सेवक यांनी भेटी देवून सर्व कागदपत्रांची पडताळणी करून परिपूर्ण प्रस्ताव तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे, ग्रामीण भागातील 46 आणि नगर पंचायत भागातील 1७2 अतिक्रमणधारकांना नियमानुकूल करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. उपविभागीय अधिकारी एटापल्ली यांच्या अध्यक्षतेखाली शक्ती प्रदत्त समिती, सदर प्रस्ताव मान्य करून संबंधित अतिक्रमित जागेचे पट्टे देण्याची कार्यवाही करतील.

नाविण्यपूर्ण उपक्रम-
1) लक्ष्मी मुक्ती योजना – शेतीच्या 7/12 वर फक्त पतीचे नाव असेल तर सदर व्यक्तीने ग्राम महसूल अधिकारी यांचेकडे अर्ज आणि संमतीपत्र दिल्यास सहहिस्सेधारक म्हणून पत्नीची नोंद करण्यात येईल. भामरागड तालुक्यात असे 1140 स्वतंत सातबारा आहेत.
2) सामूहिक सातबारावर सहहिस्सेधारक यांनी सदर शेतीची खातेफोड करून शेतीचा स्वतंत्र 7-12 तयार करुन स्वतंत्र मालकी हक्क प्रत्येक सहहिस्सेधारकाच्या नावे तयार करता येईल. यामुळे सर्व सहहिस्सेधारकांना शासनाच्या सर्वं योजनांचा फायदा स्वतंत्ररित्या मिळेल. याकरीता सर्व सहहिस्सेधारकांनी संबंधित तलाठ्यांकडे अर्ज सदर करावा. भामरागड तालुक्यात 3818 सहहिस्सेधारक असेलेले सातबारा आहेत. तहसिलदारांनी अंतिम आदेश दिल्यानंतर स्वतंत्र सातबारा तयार होतील.
3) शाळा आणि महाविद्यालययात दाखले वाटप करणे – भामरागड तातुक्यातील वर्ग 10 वी, 11 वी आणि 12 वी मधील 905 विद्यार्थ्यांना जातीचा दाखला, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र आणि जन्माचे प्रमाणपत्र सर्व शाळांमध्ये शिबिरांचे आयोजन करून वाटप करण्यात येणार आहे. त्याकरीता सर्व मुख्याध्यापक आणि सेतू केंद्र चालकांची सभा घेऊन दाखले वाटपाचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार किशोर बागडे यांनी दिली.