एटापल्ली : हेडरी येथील लॅायड्स काली अम्माल स्मृती रुग्णालयात आतापर्यंत 100 महिलांची प्रसुती यशस्वीरित्या पूर्ण झाल्या. 100 व्या महिलेने कन्यारत्नाला जन्म दिला. हा क्षण लॅायड्स मेटल्सच्या वतीने उत्सवरूपात साजरा करण्यात आला. त्या कन्यारत्नाला लॅायड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बी.प्रभाकरन यांनी चांदीची नाणी आणि बेबी किट देऊन आनंद व्यक्त केला. सोबत या रुग्णालयात प्रसुत झालेल्या सर्व महिलांना बेबी किड्सचे वाटप करण्यात आले.
हेडरी येथील लॉयड्स मेटल्सच्या वतीने उभारण्यात आलेले काली अम्माल मेमोरियल रुग्णालय सुरू झाल्यापासून आतापर्यंत 100 महिलांची प्रसुती तिथे यशस्वीपणे पार पडली. दि.10 ला 100 व्या महिलेने कन्यारत्नाला जन्म दिला. ही माहिती मिळाल्यानंतर लॅायड्स मेटल्स अॅन्ड एनर्जी लिमीटेडचे व्यवस्थापक संचालक बी.प्रभाकरन यांनी रुग्णालयाला भेट देऊन त्या कन्येचे स्वागत केले.
यावेळी रुग्णालयात 100 प्रसुतींसाठी योगदान दिलेल्या डॉ.प्रिती बुरीवार, डॉ.स्वाती रेड्डी, डॉ.उमेश उत्तरवार, डॉ.चेतन बुरीवार यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. सोबतच तीनही ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच आणि गाव पाटलांचाही शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पुरसलगोंदीच्या सरपंच अरुणा सडमेक, नागुलवाडीचे सरपंच नेवलुजी पाटील गावडे, उपसरपंच राजू तिम्मा, तोडसाचे उपसरंपच प्रशांत आत्राम, तसेच कंपनीचे अधिकारी साई कुमार, बलराम सोमनानी, शितल सोमनानी, संजय चांगलानी, हेडरी पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी सुनील दौंड, डॉ.गोपाल रॉय, हेडरीच्या माजी उपसरपंच कटिया तेलामी, सुरजागडच्या माजी सरपंच कल्पना अलाम, बोटमेटाचे गाव पाटील झुरूमासू गोटा, हेडरीचे देवाजी पाटील कवडो, मंगेरच्या अंगणवाडी सेविका केरकेट्टा, मंगेरचे गाव पाटील गोसुजी हिचामी, हालुरचे गाव पाटील लचुजी हेडो, पालीटोलाचे प्रतिष्ठित नागरिक फबीयानुस खलको, बांडेचे गाव पाटील साधू गुंडरु, हेडरीचे प्रतिष्ठित नागरिक मंगू कलमोटी, झुरू कवडो, अशोक हिचामी, बांडेचे बाजी गुंडरु, रामजी गुंडरु यांच्यासह ग्रामस्थ उत्साहाने सहभागी झाले होते.