तालुकास्तरीय शालेय बाल क्रीडा व कला संमेलनात आंबेशिवणी चॅम्पियन

सर्व सांघिक, वैयक्तिक खेळात अव्वल

गडचिरोली : गुरवळा येथे झालेल्या गडचिरोली तालुकास्तरीय शालेय बाल क्रीडा व कला संमेलनात आंबेशिवाणी केंद्राने सर्व सांघिक, वैयक्तिक, सांस्कृतिक कार्यक्रम आणि खेळांमध्ये दमदार कामगिरी केली. सर्व संघांवर मात करत या केंद्राचे विद्यार्थी चॅम्पियन ठरले.

आंबेशिवणी केंद्रातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खुर्सा, माध्यमिक मुले कब्बड्डीत प्रथम, व्हालीबॉलमध्ये मुले प्रथम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजगट्टा सांस्कृतिक (प्राथमिक गट) प्रथम, प्राथमिक व माध्यमिक मुले-मुली रिले प्रथम, 100 मीटर आणि 300 मीटर रनिंगमध्ये प्रथम, असे यश संपादन केले.

याकरिता सांघिय खेळाचे संघ प्रमुख शिक्षक जगदीश मडावी, खुर्सा शाळेचे मुख्याध्यापक सुरेश वासलवार, घनश्याम हटेवार, सांस्कृतिक प्रमुख विजया कुमरे, सागर आत्राम, खु्मेंद्र मेश्राम, सचिन मेश्राम, करमचंद भोयर, सारंग पिंपळकर, रोशनी राखडे, निवास कोडापे, संजय येलेवार, भाग्यवान मुनघाटे, ताराचंद मेश्राम यांनी सहकार्य केले.

गटशिक्षणाधिकारी हेमलता परसा आणि आंबेशिवणी केंद्राचे केंद्र प्रमुख सुरेश बांबोळकर यांनी सर्व खेळाडू व संघप्रमुखांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.