पोचम्मा देवीची बोनालू उत्सव पुजा, आत्राम दाम्पत्याकडून अन्नदान

कोतापल्लीत भाविकांची गर्दी

सिरोंचा : तालुक्यातील कोतापल्ली येथे मदनम पोचम्मा देवीच्या बोनालू उत्सव पुजेत माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम आणि डॅा.मिताली आत्राम या दाम्पत्याने उत्साहाने सहभागी होऊन अन्नदान केले.

कोतापल्लीत बोनालु पुजेसाठी भाविक मोठ्या संख्येने येत असतात. आत्राम दाम्पत्याने या पुजेत सहभागी होऊन भाविकांनी स्वहस्ते अन्नदान आणि आर्थिक मदतही केली. यावेळी त्यांनी सर्व नागरिकांच्या सुख-समुद्धीसाठी कामना केली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिरोंचा तालुकाध्यक्ष मधुकर कोल्लुरी, नागेश मडावी, महिला जिल्हा उपाध्यक्ष व्येंकटलक्ष्मी आरवली, रामकृष्ण निलम, सत्यनारायण पर्पटलावार, सत्यनारायण अगुवार, कृष्णा चुक्कावार, राजू बोतामवार, रमेश तोटावार, पुलाय्या पिडगूवार, सुरज जाधव, तिरुपती मडावी, आकाश राऊत, सुनील नैताम यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते व कोतापल्ली गावातील नागरिक उपस्थित होते.