मराठी पत्रकार परिषदेच्या केंद्रीय उपाध्यक्षपदी अविनाश भांडेकर

विदर्भात संघटन वाढविण्याची जबाबदारी

गडचिरोली : मराठी पत्रकार परिषदेच्या केंद्रीय उपाध्यक्षपदी (विदर्भ विभाग) अविनाश भांडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे येथे झालेल्या बैठकीत उपाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. त्यात ऑगस्ट 2026 पर्यत नवे उपाध्यक्ष कार्यरत असतील.

नवीन उपाध्यक्षांमध्ये विदर्भ- अविनाश भांडेकर (गडचिरोली), पश्चिम महाराष्ट्र-गणेश मोकाश (पुणे), कोकण विभाग- हेमंत वणजू (रत्नागिरी), मराठवाडा – प्रकाश कांबळे (नांदेड), उत्तर महाराष्ट्र – गो.पी.लांडगे (धुळे) आणि चंद्रकांत बर्डे (बुलढाणा) यांचा समावेश आहे.