गडचिरोली : लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड यांनी जागतिक चिमणी दिन 2026 निमित्त हेडरी येथील लॉयड्स राज विद्यानिकेतन शाळेत जनजागृती कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना चिमण्यांचे पर्यावरणीय महत्त्व आणि त्यांच्या संवर्धनाची गरज याबाबत जागरूक करणे हा होता.
हा कार्यक्रम सुरजागड आयर्न ओर खाण प्रकल्पाच्या पर्यावरण विभागामार्फत आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात संवादात्मक सत्र घेण्यात आले, ज्यामध्ये चिमण्यांची भूमिका, कीटक नियंत्रण, बियांचे प्रसारण आणि पर्यावरणाच्या आरोग्याचे विशद करण्यात आले.
विद्यार्थ्यांना चिमण्यांची घटती संख्या ही शहरीकरण, अधिवास नष्ट होणे, कीटकनाशकांचा वापर आणि प्रदूषण यांसारख्या कारणांमुळे होत असल्याची माहिती देण्यात आली. तसेच या समस्यांचा गडचिरोली जिल्ह्याच्या स्थानिक संदर्भातही आढावा घेण्यात आला.
या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना सोपे संवर्धन उपाय अवलंबण्याचे आवाहन करण्यात आले. त्यात पक्ष्यांसाठी पाणी व अन्न उपलब्ध करून देणे, घरटी बसविण्यासाठी बॉक्स तयार करणे आणि नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण करणे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक सवयी रुजवून जैवविविधता संवर्धनासाठी योगदान देण्याची प्रेरणा मिळाली.
































