गडचिरोली : 26 ते 29 जून 2025 दरम्यान जोधपूर (राजस्थान) येथे होत असलेल्या राष्ट्रीय बॅाल बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघात गडचिरोली बॉल बॅडमिंटनच्या चार खेळाडूंनी स्थान मिळवले आहे. भंडारा येथे झालेल्या वरिष्ठ गट राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेमध्ये त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे त्यांची महाराष्ट्र संघात वर्णी लागली आहे.

या खेळाडूंमध्ये गडचिरोलीच्या शासकीय विज्ञान महाविद्यालयाचा विनय कोवे, शिवाजी हायस्कूल व जुनिअर कॉलेजची मोहिनी पिंपळखेडे, माधवी कडते, निधी जांभुळकर यांचा समावेश आहे. त्यांनी आपल्या निवडीचे श्रेय बॉल बॅडमिंटन संघटनेचे आश्रयदाते माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ.मिलिंद नरोटे, माजी आमदार डॉ.देवराव होळी, बॉल बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष ओमप्रकाश संग्रामे, शिवाजी हायस्कूल व जुनिअर कॉलेजचे शारीरिक शिक्षक मनीष बानबले, मुख्य प्रशिक्षक व सचिव प्रा.ऋषिकांत पापडकर, बॅाल बॅडमिंटन फेडरेशन ऑफ इंडियाच्या मॅनेजमेंट कमिटीच्या मेंबर प्रा.रूपाली पापडकर, सुभाष धंदरे, आशिष निजाम यांना दिले आहे.

































