अंध मतदारांना मतदानासाठी तयार केल्या ब्रेल लिपीतील मतपत्रिका

निरीक्षकांसमक्ष योग्यतेची पडताळणी

गडचिरोली : अंध मतदारांकरीता ब्रेल लिपीमध्ये मतपत्रिका तयार करण्यात आल्या आहेत. त्या मतदान पत्रिकेची (बॅलेट पेपर) पडताळणी ब्रेल लिपी अवगत असलेल्या अंध प्रतिनिधींकडून घेण्यात आली. यावेळी निवडणूक निरीक्षक (सामान्य) अनिमेष कुमार पराशर, निवडणूक निर्णय अधिकारी संजय दैने उपस्थित होते.

अंध प्रतिनिधी मारोती सोमाजी भारशंकर, कुंदा सखाराम पाल आणि पुरुषोत्तम पांडूरंग किरंगे यांनी या ब्रेल लिपीतील मतदान पत्रिकेचे वाचन केले. सदर मतदान पत्रिका ब्रेल लिपीमध्येच आहे किंवा नाही याबाबत त्यांच्याकडूनपडताळणी करण्यात आली.

जिल्हा निवडणूक अधिकारी आणि निवडणूक निरिक्षक यांनी ब्रेल लिपी पडताळणीबाबत समाधान व्यक्त करुन उपस्थित अंध प्रतिनिधींनी या निवडणूक कार्यात केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके यावेळी उपस्थित होते.