गोंडवानाच्या विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्रात ‘बांबू ग्रोवर’अभ्यासक्रम सुरू

कुलसचिवांनी सांगितले कौशल्याचे महत्व

गडचिरोली : महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्था मुंबईमार्फत आणि आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांतर्गत विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्रामध्ये ‘बांबू ग्रोवर’ या अभ्यासक्रमाची सुरुवात शनिवार, दि.15 जूनला करण्यात आली. या अभ्यासक्रमाच्या पहिल्या बॅचचे उद्घाटन गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.अनिल हिरेखन यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी आदर्श पदवी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आमुदाला चंद्रमौली, एस.टी.आर.सी.चे मुख्य कार्यक्रम अधिकारी आशिष घराई तसेच प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते.

पहिल्या बॅचच्या अभ्यासक्रमासाठी आतापर्यंत 30 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. कुलसचिव डॉ.अनिल हिरेखन यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना भविष्यात कौशल्य आणि त्याचे महत्व याविषयी मार्गदर्शन करून अभ्यासक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्रातील चमूने केले.