गडचिरोली : जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी 4 ते 6 सप्टेंबर 2025 या कालावधीत संपूर्ण गडचिरोली जिल्हा “उड्डाणबंदी क्षेत्र” म्हणून जाहीर केला आहे.
या आदेशानुसार ड्रोन, पॅराग्लायडर, हॉट एअर बलून, रिमोट कंट्रोल उड्डाण साधने इत्यादींच्या वापरावर सक्त बंदी राहील. ड्रोन नियम 2021 मधील तरतुदींनुसार हा आदेश काढण्यात आला आहे. या आदेशामुळे मिरवणुकांमध्ये ड्रोन कॅमेऱ्याने व्हिडीओ शुटिंग करणाऱ्यांचा हिरमोड होणार आहे.