गडचिरोली : बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि.३ फेब्रुवारी रोजी सकाळी जिल्हा व सत्र न्यायालयात एक दिवशीय कायदेविषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम.डब्ल्यू.चांदवानी, तर अतिथी म्हणून गडचिरोलीचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश आशुतोष करमरकर उपस्थित राहतील.
सकाळी १० वाजता जिल्हा न्यायालयातील खोली क्रमांक ३०६ मध्ये कार्यशाळेचे उद्घाटन होईल. त्यानंतर सकाळी ११.१५ ते दुपारी १२.१५ पर्यंत फौजदारी खटले आणि नवीन सुधारित कायदे या विषयावर ॲड.सुदीप पासबोला, तर दुपारी १२.३० ते दुपारी १.३० सीपीसी, विहंगावलोकन या विषयांवर ॲड.जयंत डी.जायभावे हे मार्गदर्शन करतील.
यावेळी ॲड.राजेंद्र उमप, ॲड.संग्राम देसाई, ॲड.गजानन चव्हाण, ॲड.रवींद्र दोनाडकर, ॲड.पारिजात पांडे, ॲड.आसिफ कुरेशी, ॲड.मोतीसिंग मोहता, ॲड.अनिल गोवारदिपे, ॲड.आशिष देशमुख यांच्यासह महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे सदस्य आणि जिल्हाभरातील वकिल उपस्थित राहणार आहेत.