अहेरीत आज सुप्रसिद्ध भीमगीत गायिका कडूबाई खरात यांचा कार्यक्रम

धर्मरावबाबा आत्राम करणार उद्घाटन

अहेरी : फुले, शाहू, आंबेडकर विचार मंच अहेरीतर्फे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भीमगीत गायिका कडूबाई खरात यांचा गीतगायन कार्यक्रम आज (दि.25) सायंकाळी 6 वाजता स्थानिक शंकरराव बेझलवार महाविद्यालयाच्या मागील पटांगणावर आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते होणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बौद्ध समाज मंडळ अहेरीचे संस्थापक अध्यक्ष नारायण अलोणे, तर प्रमुख अतिथी म्हणून कृउबास अहेरीचे सभापती रवींद्रबाबा आत्राम, गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, पंचायत समितीचे माजी सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम, युवा नेते रामेश्वरबाबा आत्राम, ज्येष्ठ नेते बबलू हकीम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पुष्पा अलोणे, माजी प्राचार्य तथा बोधीसत्व सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष रतन दुर्गे, अहेरी नगर पंचायतीचे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन, आलापल्लीचे सरपंच शंकर मेश्राम, उपसरपंच विनोद आकनपल्लीवार आदी मान्यवर उपस्थित असणार आहेत. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजक सुरेंद्र अलोणे यांनी केले आहे.