खेडेगाव येथे बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे अनावरण व महोत्सव

खासदार-आमदारांची उपस्थिती

कुरखेडा : तालुक्यातील खेडेगाव (गेवर्धा) येथील माऊली चौकात उभारण्यात आलेल्या क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि आदिवासी कोयापुनेम (गोंडीधर्म) महोत्सवाचे आयोजन उत्साहात केले होते.

यावेळी गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेव किरसान, नवनिर्वाचित आमदार रामदास मसराम, माजी आमदार कृष्णा गजबे यांनी उपस्थित राहून पुतळ्याचे अनावरण करत सत्कार स्वीकारून मार्गदर्शन केले.

यावेळी जि.प.चे माजी उपाध्यक्ष जीवन नाट, परिवहन सेलचे जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले, माजी सभापती परसराम टिकले, जयंत पाटील हरडे, शालीकराम मानकर, व्यंकटी नागीलवार, विजय तुलावी, चांगदेव फाये, प्रभाकर तुलावी, रोशन सय्यद, शारदा पोरेटी, सुषमा मडावी, भाग्यरेखा वझाडे, संगिता बुद्धे, धरमदास उईके, राजेंद्र कुमरे, ओमप्रकाश भोगा, वड्डे महाराज यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते तथा मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.