गोंडवाना विद्यापीठात क्रांतिवीर बिरसा मुंडा अध्यासन केंद्र

आज होणार केंद्राचा शुभारंभ

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठात क्रांतिवीर बिरसा मुंडा अध्यासन केंद्राचे उद्घाटन, शुक्रवार दिनांक 10 ऑक्टोबरला सकाळी 11.30 वाजता जुने सभागृह, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे, तर उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून नागपूर येथील बिंझाणी सिटी कॅालेजचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.संदीप तुंडुरवार राहतील. विशेष उपस्थिती म्हणून प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे राहतील.