गतीमंद विद्यार्थ्यांच्या सानिध्यात साजरा केला अंकित किरणापुरेंनी वाढदिवस

सामाजिक दायित्वातून साहित्य वाटप

गडचिरोली : शहरात सध्या सर्वांचे आकर्षण ठरलेल्या रात्रकालीन केपीएल (किरणापुरे प्रिमियर लिग)चे आयोजक आणि सामाजिक कार्यकर्ते इंजिनिअर अंकित किरणापुरे यांनी बुधवारी आपला वाढदिवस बोदली येथील कौसल्या निवासी मतीमंद विद्यालयात साजरा केला. यावेळी त्यांनी सामाजिक दायित्वाच्या भावनेतून विद्यार्थ्यांसाठी उपयोगाच्या भेटवस्तूही दिल्या.

विद्यार्थ्यांना महापुरूषांच्या कार्याची ओळख व्हावी आणि त्यातून चांगले काही करून दाखविण्याची प्रेरणा मिळावी यासाठी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो कौसल्या निवासी विद्यालयाला भेट दिला. तसेच विद्यार्थ्यांना भेटवस्तू आणि फळांचेही वाटप केले. वाढदिवसाचा छोटेखानी कार्यक्रमही त्यांच्यासोबत घेऊन विद्यार्थ्यांसोबतच केक कापून त्यांना आपल्या आनंदात सामावून घेतले.

यावेळी मित्र परिवारातील सचिन मालखेडे, लेनिन मडावी, साहिल वादीकर, सौरव वादीकर, कुणाल वादीकर, गौरव लिपटे, सुधाकर नैताम, समीर पिंपरे, बालाजी वादीकर, भगवान चिडगे, मुकुंदा तुमराम, देवेंद्र पाटील, सरपंच आकाश निकोडे, सदस्य सुजाता पिपरे, चंदू कुनघाकर आदींसह गावकरी मंडळी उपस्थित होती.

यावेळी कौसल्या निवासी मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रशांत जोशी, विशेष शिक्षक राजू भोमले, प्रमोद चिल्लरवार, उमेश देशमुख, तनुजा मोहिते, राजू सुरसे, दिवाकर पिपरे, राजू सूर्यवंशी, रवींद्र जयपूरकर, पुनित गाडगे, अतुल बनपूरकर, चंपा कुकडकर यांनीही अंकित किरणापुरे यांना शुभेच्छा देत त्यांच्या हातून सामाजिक कार्य घडत राहो, अशी अपेक्षा व्यक्त केली.