आरमोरी : बरेच वेळा गरजवंत नागरिकाला वेळेवर रक्त मिळत नसल्याने धावपळ करावी लागते. अशी धावपळ करण्याची वेळ कोणावर येऊ नये, गोरगरीब रुग्णांना रक्ताचा तुटवडा पडू नये या उद्देशाने स्वयं रक्तदाता जिल्हा समिती गडचिरोली, दिलीप घोडाम मित्र मंडळाने पुढाकार घेऊन येथील उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी स्वयं रक्तदाता समितीचे अध्यक्ष चारुदत्त राऊत यांच्या नेतृत्वात 25 युवकांनी रक्तदान केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिलीप घोडाम, प्रा.के.टी.किरणापुरे, अजय नव्हाते, प्रफुल्ल खापरे, तुषार रामटेके, अंशुल जैन, आशिष कत्रे, कवीश्वर खोब्रागडे, करण बोगा, वेदांत टिचकुले, अखिल बोंद्रे, भूषण नखाते, सुशील निकेसर, शुभम आखाडे, साहिल जुवारे, सचिन जेटी, नरेश निकुरे, मनमोहन भरणे, आकाश सोरते, आशिष कुथे, अमित हुमने, यांच्यासह अन्य युवकांनी रक्तदान केले.
या शिबिरासाठी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.भूषण नखाते, अजय नखाते, जिल्हा रक्तपेढी गडचिरोली येथील डॉ.राहुल सिडाम, सूरज चांदेकर, प्रमोद देशमुख, हिमांशू भांडेकर, रोहित नामनवार, आशिष मेश्राम आदींनी सहकार्य केले.
            































