गडचिरोली : जिल्ह्यात रक्ताची गरज पाहता लॅायन्स क्लबच्या वतीने नेहमीच रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते. येथील कमल-केशव सभागृहात आयोजित रक्तदान शिबिरात यावेळी शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. सामाजिक बांधिलकी जपत 34 पुरूषांसह 5 महिलांनीही रक्तदान केले.
जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर ताराम व त्यांच्या चमुने या शिबिराच्या आयोजनासाठी सहकार्य केले. रक्ताची कमतरता भरून काढणे आणि गरजू लोकांना मदत करणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता. रक्तदात्यांचे स्वागत करून त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच रक्तदात्यांचे व सहकार्य करणाऱ्या संस्थांचे आभार व्यक्त करण्यात आले.
यावेळी लॉयन्स क्लबचे अध्यक्ष महेश बोरेवार, सचिव नितीन बट्टूवार, कोषाध्यक्ष संध्या चिलमवार तसेच शेमदेव चापले, देवानंद कामडी, मदत जीवानी, दीपक मोरे, सुनील देशमुख, प्रभु सादमवार, सतीश पवार, नितीन चंबूलवार, रमेश काळबांडे, घनश्याम परशुरामकर, पुरुषोत्तम वंजारी, सपना बोरेवार, सविता बट्टूवार आदी सदस्य उपस्थित होते.