चामोर्शी : संत निरंकारी चॅरीटेबल फाउंडेशन नवी दिल्ली, शाखा चामोर्शीच्या वतीने येथील संत निरंकारी सत्संग भवनात रविवारी (दि.7) रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यात 80 रक्तदात्यांनी रक्तदानासाठी पुढाकार घेतला. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. त्यामुळे रक्तदात्यांनी स्वतःहून पुढे येऊन हे मानवतेचे कार्य पुढे न्यावे, असे प्रतिपादन यावेळी संत निरंकारी मंडळ वडसा आणि नागपूरचे झोनल इन्चार्ज किशन नागदेवे यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना केले.
शिबिराचे उद्घाटन माजी आमदार डॉ.देवराव होळी यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जीवनकला बोरकुटे, खुशाल झोडगे, आयोजक अशोक बोरकुटे, सुरेश शहा, साईनाथ बुरांडे, जयराम चलाख, डॉ.राजेंद्र झाडे, डॉ.किशोर आत्राम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
सद्गुरु बाबा हरदेवसिंह महाराज यांच्या वचनानुसार रक्तदान करून रक्त हे मानवाच्या नाडी मध्ये वाहिले पाहिजे, या उदात्त हेतूने रक्तदान शिबिराचे आयोजन केल्या जाते. संत निरंकारी मंडळ चामोर्शीच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाचे संचालन वैशाली लंजे तर आभार प्रदर्शन विद्या बोरकुटे यांनी केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी सेवादल संचालक भोजराम लंजे, फुलचंद गेडाम, प्रफुल गवारे , निरंजना रामटेके, वंदना ढोडरे, देवनाथ ढोडरे, नाजूक येलमुले, रवींद्र बुरांडे, निकेश खोब्रागडे, गिरिधर कन्नाके, घनश्याम बोधलकर, सुभाष मिडपलीवार, वसंत वासेकर, सुरेश बावणे, चिन्हाची करेवार, कोमरू मिटपलीवर, प्रशांत बुध्दे , रूपचंद पिपरे, तेजराम लंजे, पंढरीनाथ पाल, प्रमोद देवगिरकर, दिलीप भोयर, छगनलाल पर्वते, आशुतोष कोठारे, रामदास पुंघाटी, संतोष कसंगोतीवार, सुभाष धाली, निरंतर लोणारे, संतोष वडेगवार, अवतार तंतकवर आदींनी सहकार्य केले.