मुरखळात मोतीबिंदू तपासणी व मोफत चष्मे, भिंगारोपण शिबिर

गण्यारपवार फाऊंडेशनचे आयोजन

गडचिरोली : गण्यारपवार फाऊंडेशन व महात्मे आय हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने मुरखळा चक येथे मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिर, मोफत चष्मे वाटप आणि मोफत भिंगारोपण शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांच्या हस्ते करण्यात आले. परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या शिबिराचा लाभ घेतला.

यावेळी मार्गदर्शन करताना अतुल गण्यारपवार म्हणाले, या भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सदैव तत्पर आहोत. मार्केटिंग फेडरेशनकडून शेतकऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणी दूर करण्याचे काम आम्ही करणार आहोत. सर्वसामान्यांची सेवा करणे हेच आपले प्रथम कर्तव्य आहे, असे ते म्हणाले.

या कार्यक्रमाला प्रामुख्याने आयोजक मधुकर चिंतलवार (उपाध्यक्ष, राकाँ श.प.) नरेंद्र जुवारे (सरचिटणीस), कुंदा जुवारे (सरपंच, भेंडाळा), भाग्यश्री चिंतलवार (माजी पं.स.सदस्य), तसेच सुरेश परसोडे (माजी पं.स. सदस्य), गोसाई सातपुते (संचालक, कृ.ऊ.बाजार समिती चामोर्शी), शिक्षक टिचकुले, गुलाब धोती, पंकज देहलकर, प्रभाकर वन्नेवार, शिवराम वन्नेवार, नारायण माडेमवार, प्रमोद कारकुरवार, राजेंद्र तीर्थलवार, वसंत चंदनगिरीवार, साईनाथ कारकुरवार, धनराज पूज्जलवार, तेजराज कराडवार, केशव माडेमवार, अमोल वन्नेवार, रामदास वन्नेवार, जगन्नाथ परशनवार, नारायण कारकुरवार, उष्टुजी मेश्राम, माणिक मेश्राम, आबाजी पेंदोर, दागोजी वाढगुरे, लोमेश गेडाम, प्रशांत दुर्गे, नंदू नल्लूरवार, वसंत नल्लूरवार, भैय्याजी पिटले, नानाजी पिटले, दौलत मडावी, दिलीप गायकवाड, जितेंद्र वाळके, पत्रुजी घोडे, गुलाब कुनघडकर, रामचंद्र कुनघडकर, धोंडुजी वैरागडे, निंबाजी मिसार, मारोती माडेमवार, शोभा आक्रेडवार, रेखा चलीगंजेवर, सुमन सातपुते, विमल चिंतमवार, सिंदू कारकुरवार इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच गावकरी उपस्थित होते.