जिल्हाभरातील तान्हा पोळ्यात झळकली कृषीप्रधान संस्कृती

बालगोपालांचा उत्साहाने सहभाग

गडचिरोली : बैलपोळ्याचा दुसरा दिवस, अर्थात तान्हा पोळा जिल्ह्याच्या ग्रामीण भागासोबत शहरी भागातही प्रत्येक मोहल्ल्यात उत्साहात साजरा करण्यात आला. खऱ्याखुऱ्या बैलांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असली तरीही बालगोपालांकडे नंदीबैलांची संख्या मात्र वाढत असल्याचे दिसून आले. घराघरातील बालकांना तान्हा पोळ्यात सहभागी करून घेत पालवर्गाने कृषीप्रधान संस्कृतीला जोपासले. यानिमित्त विविध वेशभुषा आणि नंदींच्या सजावटीसाठी त्या बालकांवर हजारो रुपयांच्या बक्षिसांची लयलूट करण्यात आली.

रामनगर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौक, रामनगर, स्वामी विवेकानंदनगर, आशीर्वाद नगर, रेड्डी गोडाऊन चौक अशा गडचिरोली शहरातील विविध ठिकाणच्या तान्हा पोळ्यासोबत चामोर्शीच्या बाजार चौकातील नगर पंचायतच्या पटांगणात भरलेल्या तान्हा पोळ्याला माजी खासदार तथा भाजपचे राष्ट्रीय महामंत्री (एस.टी.मोर्चा) डॅा.अशोक नेते यांनी उपस्थिती लावून बालगोपालांचा उत्साह वाढविला.

चामोर्शी येथील तान्हा पोळ्याच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना ते म्हणाले, तान्हा पोळा व बैल पोळा हा उत्सव आपली संस्कृती आहे. यानिमित्ताने सर्वधर्म समभाव जागृत होऊन एकोपा निर्माण होतो. आज बालगोपालांनी दाखवलेली सर्जनशीलता, छोट्या नंदीबैलांच्या मिरवणुका आणि निरागस आनंद पाहून मन भरून आलं. आपल्या परंपरेचे जतन आणि संवर्धन करणे हे आपलं कर्तव्य आहे. अशा कार्यक्रमातून समाजात ऐक्य, आपुलकी आणि संस्कृतीची मुळे अधिक बळकट होतात, असे सांगत बालगोपालांचा आनंद असाच फुलत राहो, शेतकरी बांधवांच्या आयुष्यात समृद्धी नांदो, अशा शुभेच्छा दिल्या.

यावेळी मंचावर प्रामुख्याने गडचिरोली विधानसभेचे आमदार डॉ.मिलिंद नरोटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, माजी आमदार डॉ.देवराव होळी, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, कामगार आघाडीचे प्रदेश सचिव गोवर्धन चव्हाण, भाजपा तालुकाध्यक्ष रोशनी वरघंटे, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर पेटकर, बंडू नैताम, वासुदेव चिचघरे तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ, शेतकरी बांधव, महिला भगिनी आणि लहान मुले, बालगोपाल उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक आशिष पिपरे, सामाजिक कार्यकर्ते अमोल आईचवार, न.पं.सभापती सोनाली पिपरे, नगरसेविका प्रेमा आईचवार, तसेच मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.

पोटगावात मा.आ.गजबे यांच्या हस्ते साहित्य वाटप

विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वाटप करताना मा.आ.कृष्णा गजबे

देसाईगंज तालुक्यातील पोटगाव येथे ग्रामस्थांनी पारंपरिक तान्हा पोळा साजरा करत आपल्या संस्कृतीचे जतन केले. याप्रसंगी माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीसाठी आमदार कृष्णा गजबे यांच्याकडून नोटबुक आणि पेनचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. यावेळी स्थानिक नागरिक, शिक्षक, विद्यार्थ्यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण गावकरी या निमित्ताने एकत्र येऊन सणाच्या आनंदात सहभागी झाले. बुक-पेन वाटपामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला चालना मिळाली.

गडचिरोलीच्या नेहरू वार्डात विविध बक्षिसे

वेशभुषा स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिस वाटप करताना रविंद्र वासेकर व इतर.

गडचिरोली शहरातील नेहरू वार्डात (आशीर्वाद मंगल कार्यालयाजवळ) भरलेल्या तान्हा पोळ्यात बक्षिसांची लयलूट करण्यात आली. जय शिवछत्रपती शिवाराजी महाराज ग्रुप तथा रवीमामा वासेकर मित्र परिवाराच्या वतीने या तान्हा पोळ्याचे आयोजन केले होते. यावेळी उद्घाटन आणि बक्षीस वितरण राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर यांनी केले. कार्यक्रमाला प्रामुख्याने माजी नगराध्यक्ष प्रमोद वैद्य, राकाँच्या महिला जिल्हाध्यक्ष डॅा.सोनल कोवे, विजय धकाते, मंडळाचे अध्यक्ष अंकुश मारभते, सचिव प्रफुल्ल धारणे उपस्थित होते. या उत्सवासाठी योगेश नंदगाये, समीर नाथानी, दिनेश मांडवखात, अविनाश साळवे आदींनी सहकार्य केले. यात प्रथम तीन क्रमांकांच्या नंदींसाठी सहभागी मुलांना सायकल आणि 10 प्रोत्साहनपर बक्षीसे देण्यात आली. त्यात वॅाटर बॅाटल, टिफीन आणि स्कूल बॅग यांचा समावेश होता. यात 607 नंदीबैल घेऊन बालगोपाल सहभागी झाले होते.

पोर्लात सजावट व वेशभुषेला बक्षिसे

पोर्ला येथील शिवमंदिरात आयोजित तान्हा पोळ्यात उत्साहात मोठ्या संख्येने बालगोपालांनी नंदीबैलांना आकर्षक सजवून आणि वेशभुषा करून सहभाग घेतला. केशवराव दशमुखे आणि सिंधुबाई दशमुखे यांनी नंदीबैलांचे विधिवत पुजन केले. विजेत्या स्पर्धकांना माजी पोलीस निरीक्षक देवीदास भोयर, माजी मुख्याध्यापक नानाजी म्हशाखेत्री, कृ.उ.बा.समितीचे संचालक बापू फरांडे, माजी सरपंच दीपक चुधरी, माजी सरपंच परशुराम बांबोळे, भाजपा तालुका महामंत्री लोमेश कोलते, तसेच रवी सेलोटे, पांडू भोयर, माजी सरपंच विठ्ठलराव फरांडे यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. तसेच गोपालकाल्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी अशोक चापले, बोबा बानबले, महादेव बांबोळे, नामदेव महाराज, मनोज किरमिरे, राकेश शिवणकर, गोपाल दाणे, पंकज येवले, प्रभाकर लाडवे, बंटी उपासे, माणिक राऊत, शाहू महाराज येवले यांच्यासह नागरिक व बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी सुरेश दशमुखे, रामचंद्र दशमुखे, विनोद दरमुखे, गजानन दशमुखे, अमोल दशमुखे, विवेक निशाने, अक्षय दशमुखे, शुभम दशमुखे, आराध्य दशमुखे यांनी सहकार्य केले.

हे ठरले बक्षीसांचे मानकरी

तान्हा पोळ्यात नंदीबैल सजावट व वेशभुषा या दोन स्पर्धेचे आयोजन केले होते. नंदीबैल सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांक चार्वी नवीन म्हशाखेत्री, द्वितीय क्रमांक सारवी शुभम वाढणकर, तर तृतीय क्रमांक तक्षवी विवेक सोनवणे यांनी पटकाविला. वेशभुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक रियांश राकेश शिवणकर व उत्कर्ष रुपेश शिवणकर, द्वितीय क्रमांक मानव कैलास चापले व आराध्या ज्ञानेश्वर कोटगले, तर तृतिय क्रमांक वृषभ पंकज दाणे व हर्षद दु्र्वेश दाणे यांनी पटकावला. कार्यक्रमाचे संचालन माजी उपसभापती विलास दशमुखे यांनी तर आभार संतोष दशमुखे यांनी मानले.