कोंढाळ्यातील ‘त्या’ मृत बालकाच्या कुटुंबियांना चार लाखांच्या धनादेशाचे वाटप

आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते प्रदान

देसाईगंज : तालुक्यातील कोंढाळा येथील वंश विजय भुते या 8 वर्षीय मुलाचा गावाजवळच्या तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना 20 जुलैच्या रोजी घडली होती. नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झाल्याची नोंद झाल्याने या बालकाच्या वारसास आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते शासनाकडून चार दिवसांतच 4 लाखांची मदत देण्यात आली. यावेळी तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीच्या वतीने देसाईगंजच्या तहसीलदार प्रीती डुडूलकर प्रामुख्याने उपस्थित होत्या.

शेजारील अल्पवयीन सवंगड्यांसोबत वंश दुपारच्या सुमारास गावालगत असलेल्या तळ्यात मासे पकडण्यासाठी गेला होता. सोबतची मुले घरी परतली, मात्र वंश एकटाच तलावाजवळ होता. यादरम्यान तळ्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

धनादेश वितरीत करतेवेळी भाजपचे देसाईगंज तालुकाध्यक्ष सुनील पारधी, जेष्ठ कार्यकर्ते पंढरी नखाते, गावच्या सरपंच अपर्णा राऊत, पोलीस पाटील किरण कुंभलवार, देसाईगंज तहसील कार्यालयाचे एन.एम. सुरपाम, एस.जी.वलथरे, ग्रामपंचायत सदस्य संदीप वाघाडे, शेषराव नागमोती, गोकुल ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते अरुण कुंभलवार, नितेश पाटील, प्रभाकर चौधरी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.