गडचिरोली : जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात ग्राहकांमध्ये जागरूकता आणण्यासाठी विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. सध्या प्रत्येकाशी निगडीत अशा सायबर फसवणुकीला टाळण्यासाठी काय दक्षता घ्यावी याबद्दलही यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. (अधिक बातमी खाली वाचा)

कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या सदस्य प्रतिभा पाटील आणि माजी अध्यक्ष सादिक झवेरी यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून ग्राहक तहसीलदार कांबळे, आयोगाच्या सदस्य माधुरी आटमांडे, सायबर सेलच्या पोलीस उपनिरीक्षक नेहा हांडे, जिल्हा ग्राहक संरक्षण समितीचे अशासकीय सदस्य चंद्रशेखर भडांगे, प्रविण घाटे, सुरज मेश्राम, ग्राहक पंचायतचे जिल्हा संघटक उदय धकाते, ग्राहक समितीचे जिल्हा अध्यक्ष विजय चाटे, कमलेश तुमसरे आदींसह कार्यक्रमाला नागरिक, विद्यार्थी आणि ग्राहक चळवळीतील कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. (अधिक बातमी खाली वाचा)

जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांनी प्रस्ताविक केले. आधुनिक काळात सायबर क्राईमव्दारे होणाऱ्या फसवणुकीपासून सावधानता कशी बाळगावी, त्याकरीता आवश्यक उपाययोजना कशा कराव्या याबाबत अतिशय महत्वपूर्ण माहिती पो.उपनिरीक्षक नेहा हांडे यांनी दिली. (अधिक बातमी खाली वाचा)

इतर वक्त्यांनी बदलत्या काळात बाजारपेठ विस्तारत असताना ग्राहकांनी केवळ वस्तू खरेदी न करता, त्यातील गुणवत्ता, किंमत आणि सुरक्षेबाबत सजग राहणे गरजेचे आहे. ग्राहकांवर अन्याय झाल्यास स्वतः पुढाकार घेऊन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, गडचिरोली यांच्याकडे तक्रार नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले. (अधिक बातमी खाली वाचा)

जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त प्रबोधन व्हावे यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग, वैधमापन शास्त्र विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, भारत संचार निगम लिमीटेड, श्री गॅस एजन्सी गडचिरोली, कृषी विभाग यांचेमार्फत प्रदर्शनी लावण्यात आली होती.
कार्यक्रमाचे संचालन रुपचंद फुलझेले यांनी, तर आभार प्रदर्शन जिल्हा पुरवठा कार्यालयाच्या अश्विनी आसवले यांनी केले.



































