गडचिरोली : महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने दि.26 व 27 जानेवारी २०२६ रोजी राज्यस्तरीय अधिवेशन व आमसभा हिंगोली येथे होणार आहे. या अधिवेशनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून शेकडो वृत्तपत्र विक्रेते उपस्थित राहणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यातूनही अनेक जण जाणार आहेत.
अधिवेशनाचे उद्घाटन दि.27 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता अन्न व औषध प्रशासनमंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंगोलीचे आमदार तानाजीराव मुटकूळे राहतील. स्वागताध्यक्ष म्हणून हिंगोलीचे आ.हेमंत पाटील व हिंगोलीचे खा.नागेश पाटील आष्टीकर राहणार आहेत.
यावेळी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटणकर, कार्याध्यक्ष बालाजी पवार, सरचिटणीस विकास सूर्यवंशी, कोषाध्यक्ष राजेंद्र टिकार, ज्येष्ठ सल्लागार शिवगोंडआण्णा खोत, राज्य संघटना व्यवस्थापन समितीचे सदस्य संजय पावसे, दत्ता घाडगे, गोपाळ चौधरी, राज्य संघटनेचे विभागीय उपाध्यक्ष, विभागीय संघटन सचिव, राज्य कार्यकारणी सदस्य उपस्थित राहणार आहेत.
या अधिवेशनात वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रलंबित मागण्यांवर सखोल चर्चा करण्यात येणार आहे. या अधिवेशनाला गडचिरोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त वृतपत्र विक्रेत्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन गडचिरोली संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल बाळेकरमकर, उपाध्यक्ष राजेन्द्र गव्हारे, सचिव लोमेश बांबोळे, कोषाध्यक्ष प्रशांत वाढई, सचिन आकरे, मारोती बाळेकरमकर, संदीप आकरे, देवेंद्र बारापात्रे, पुरुषोत्तम रोळे, उमेश सोनटक्के, विक्रम गव्हारे, आकाश वैरागडे आदी सदस्यांनी केले आहे.
































