चामोर्शी : तालुक्यातील हळदवाही टोला गावाने क्रीडा संस्कृती जपत मुलांच्या अंडरआर्म टेनिस बॅाल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले. गावकऱ्यांच्या या उत्साहाला प्रोत्साहन देत माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांनी स्पर्धेच्या उद्घाटनाला उपस्थित राहून खेळाडू आणि गावकऱ्यांचा उत्साह वाढविला.
संघशिल क्रिकेट क्लबच्या सौजन्याने आयोजित या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांचे पूजन करून, फित कापून आणि चेंडू टोलवून मा.खा.डॉ.अशोक नेते यांनी स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन केले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, खेळ हा युवकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. खेळामुळे शरीर तंदुरुस्त राहते. यासोबतच मानसिक ताजेपणाही लाभतो. अशा छोट्या स्पर्धांमधूनच उद्याचे उदयोन्मुख खेळाडू तयार होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गावात अभ्यासिकेची गरज लक्षात घेऊन त्या मागणीचा विचार केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
या कार्यक्रमाच्या वेळी पाहुणे म्हणून चामोर्शीचे नगरसेवक आशिष पिपरे, भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्ष अनिता रॉय, शिक्षक वकील खेडकर, पोलीस पाटील केशव दुर्गे, उपसरपंच छत्रपती दुर्गे, देवाजी कांबळे, जगदीश मेश्राम, महेंद्र हिचामी, रोहीदास नरोटे, चक्रपान चुनारकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी संघशिल क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष वैभव गोवर्धन, शुभम वनकर, प्रज्वल वाळके, प्रतिक उराडे, सिद्धार्थ रायपूरे, करण खोब्रागडे व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उत्कृष्ट आयोजन केले. गावातील महिला भगिनींनी पारंपरिक पद्धतीने ओवाळून व औक्षण करून मा.खा.डॉ.नेते यांचे स्वागत केले.