गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात यावर्षीच्या रबी हंगामात पिकांची स्थिती चांगली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जिल्ह्याची सरासरी हंगामी पैसेवारी 65 पैसे इतकी ठरविण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिली.
जिल्ह्यात एकूण 1,689 गावे असून त्यापैकी 148 गावे रबी पिकांची आहेत. या रबी पिकांच्या गावांपैकी 88 गावांमध्ये पीके नसल्याचे आढळून आले आहे. उर्वरित रबी पिक असलेल्या गावांपैकी 50 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेले एकही गाव नाही. ५० पैशांपेक्षा जास्त पैसेवारी असलेल्या रबी पिकांच्या गावांची संख्या 60 आहे.
या अनुषंगाने जिल्ह्यातील एकूण 60 गावांमध्ये रबी पिकांची हंगामी पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. सन 2025-26 या वर्षासाठी गडचिरोली जिल्ह्याची रबी पिकांची हंगामी पैसेवारी 65 पैसे इतकी निश्चित करण्यात आली आहे.
































