वैरागडमधील गणेशोत्सवाला पंचक्रोशीतील नागरिकांची गर्दी

धर्मरावबाबा आत्राम यांची उपस्थिती

गणेशोत्सवात आदिवासी नृत्य सादर करताना पथक.
गोपाळकाल्याची हंडी फोडताना धर्मरावबाबा आत्राम, बलराम सोमनानी, शितल सोमनानी

आरमोरी : वैरागड येथे 10 दिवसीय गणेशोत्सव आणि विविध कार्यक्रमांना पंचक्रोशीतील नागरिकांनी हजेरी लावली. भोलूभाऊ सोमनानी मित्र परिवारातर्फे आयोजित या उत्सवाची भव्य मिरवणुकीने सांगता झाला. विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण, नागरिकांचा सत्कार आणि गोपालकाल्यासाठी माजी मंत्री आणि आमदार धर्मरावबाबा आत्राम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या उत्सवादरम्यान 10 दिवस रात्रकालीन खुली कबड्डी स्पर्धा घेण्यात आली. त्यात प्रथम बक्षीस 22222 रुपये (शितल सोमनानी यांचेतर्फे), द्वितीय 11111 रुपये (गौरी सोमनानी यांचेतर्फे), तर तृतीय बक्षीस 5555 रुपये (शोभाताई सोमनानी यांच्याकडून) देण्यात आले.

महिलांसाठी पाककला व रांगोळी स्पर्धा, तसेच सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात ग्रुप व एकल नृत्यासाठी विविध आकर्षक बक्षिसे देण्यात आली. भजन संमेलनात वेगवेगळ्या गावातील भजन मंडळींनी सहभागी होऊन सादरीकरण केले. विशेष आकर्षण म्हणजे यावर्षी पहिल्यांदा या उत्सव परिरसरात मिनाबाजार लागला होता. त्याचा सर्व गावकऱ्यांनी, मुलांनी आनंद लुटला.

समारोपाला परिसरातील जवळपासच्या गावांमधील 700 पेक्षा जास्त वयोवृद्ध महिला-पुरूष आणि विधवा भगिनींचा साडी आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला. त्यातील निवडक लोकांचा प्रतिनिधीक स्वरूपात धर्मरावबाबांच्या हस्ते सत्कार झाला.

शुक्रवारी संध्याकाळी भजनाच्या तालात गोपाळकाल्याची हंडी आ.धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते फोडण्यात आली. यानंतर सत्कार, बक्षीस वितरण आणि भव्य महाप्रसाद वितरण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शितल सोमनानी, संचालन रामदास डोंगरवार यांनी तर आभार प्रदर्शन गौरी सोमनानी यांनी केले.